परिचय
दि. ०७/०१/१९५५ रोजी ग्रामपंचायत कोठली खुर्द ता.नंदुरबार जि.धुळेची स्थापना करण्यात आली. तदनंतर दि. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा नव्याने निर्माण झाला. दि. १ जुलै १९९८ रोजी ग्रामपंचायत कोठली खुर्द ता.नंदुरबार जि.नंदुरबार नावाने प्रचलित झाली.
जिल्ह्यातील सहा तहसील : अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापुर नुसार जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सहा पंचायत समिती तहसील मुख्यालयी कार्यरत आहेत.
नंदुरबार पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कोठली खुर्द ता.जि.नंदुरबार येते. ग्रा.पं.कोठली खुर्दच्या कार्यक्षेत्रात आदिवासी बहुल ग्रामीण क्षेत्र आहे. मौजे कोठली खुर्द ग्रांमपचायतीचे विभाजन होऊन दि २६/०७/२००१ रोजी वागशेपा ही नवीन ग्रामपंचायत कोठली खुर्द मधुन विभाजीत झाली. तसेच विवीध ग्राम विकास विभाग – महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखाली ग्रामीण क्षेत्रातील जन जीवन उंचविणे तसेच आरोग्य व मूलभूत सुविधा पुरविण्याचे कार्य लोक प्रतींनिधी यांच्या सहकार्याने अविरत सुरू आहे.
ग्रामपंचायत कोठली खुर्द, तालुका व जिल्हा नंदुरबार हे एक लहान पण निसर्गरम्य गाव आहे. खालीलप्रमाणे गावाचा थोडक्यात परिचय देत आहे.
१. भौगोलिक स्थिती :
-
कोठली खुर्द हे गाव नंदुरबार तालुक्यापासुन १४ कि.मी. वर वसलेले आहे.
-
गावाच्या आजूबाजूला डोंगराळ प्रदेश व लघुमध्यम सिंचन प्रकल्प तसेच हिरवाई आहे.
-
शेतीसाठी काळी सुपीक जमीन व पाण्याचे नैसर्गिक स्रोत येथे उपलब्ध आहेत.
२. लोकसंख्या व समाजरचना :
-
गावाची लोकसंख्या साधारण २०११ च्या जनगणनेनुसार एकुण ४६७६ महीला -२६४७ व पुरुष -२०२९ आहे.
-
कुटंब संख्या १११७ असुन , अ.जा.-१०१ / अ.जमाती-३०५७ /इतर-१४८६ /सर्वसाधारण-३२ विगतवार लोकसंख्या आहे
-
शेतकरी संख्या- ३५१ आहे. बहुसंख्य लोक शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि छोटे उद्योग यावर अवलंबून आहेत.
-
गावात विविध समाज व जाती-जमाती सौहार्दाने राहतात.
३. अर्थव्यवस्था :
-
मुख्य व्यवसाय शेती असून ज्वारी, बाजरी, मका, भाजीपाला यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.
-
काही ठिकाणी दुग्धव्यवसाय व लघुउद्योग देखील आहेत.
४. शैक्षणिक व सामाजिक सुविधा :
-
प्राथमिक शाळा ३ व अंगणवाडी केंद्रे ७ उपलब्ध आहे.
-
गावात आरोग्य उपकेंद्र असुन प्राथमिक आरोग्यसेवा केंद्र नटावद अतर्गत येत .
-
ग्रामपंचायत कार्यालयातून पाणीपुरवठा, स्वच्छता, शासकीय योजना राबवल्या जातात.
५. सांस्कृतिक वैशिष्ट्ये :
-
गावात दरवर्षी आदयशक्ती मातेचा जत्रा- नवरात्रोत्सव ,गणेश उत्सव ,आदीवासी दिवसी साजरा केला जातो.तसेच पारंपरिक सण आणि लोककला हे आकर्षणाचे केंद्र आहे.
-
गावकरी एकत्र येऊन धार्मिक व सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करतात.

कार्य करणारी, पारदर्शक आणि विकासाभिमुख ग्रामपंचायत
ग्रामपंचायत कोठली खुर्द, ता. नंदुरबार ही एक प्रगतिशील व लोकसहभागातून चालणारी ग्रामपंचायत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत विविध शासकीय योजना राबवित आहे.
ग्रामपंचायतीच्या कार्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता अभियान, रस्ते दुरुस्ती व बांधकाम, शोषखड्डे बांधकाम, वृक्ष लागवड, जलसंधारण कामे, अंगणवाडी व शाळा दुरुस्ती, सार्वजनिक दिव्यांची देखभाल इत्यादी कामांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत नियमितपणे ग्रामसभा घेऊन गावकऱ्यांच्या अडचणी ऐकते व त्यावर योग्य तो निर्णय घेते. प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, व महिला-बालविकास योजना प्रभावीपणे राबविण्यात येतात.
कोठली खुर्द ग्रामपंचायत गावाच्या स्वच्छतेबरोबरच पर्यावरण संरक्षण, वृक्ष लागवड आणि लोकसहभाग यावरही भर देते. गावातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग घेऊन विकासकामे पार पाडली जातात.
Vision & Values
-
Be Kind
-
Be Respectful
-
Be Responsible
-
Work Hard
-
Time Bound Work

कर्मचारी निर्देशिका
श्रीमती.के.के.वळवी
क्लार्क
मो.9527426032
श्री.लक्ष्मण आत्माराम नरभर
शिपाई
मो.9763597105
श्री.कृष्णा सेला वसावे
श्री.कृष्णा शिवाजी गावीत
पाणीपुरवठा कर्मचारी
रोजगार सेवक
मो.8308066551
मो.8999286913
श्री.विशाल राजु वळवी
संगणक परिचालक
मो.9370558001






