top of page

ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधा

विभागाविषयी : गावातील रस्ते, ड्रेनेज सिस्टीम आणि पथदिव्यांचे बांधकाम आणि देखभाल सामुदायिक सभागृहे,

                         बाजारपेठा आणि खेळाच्या मैदानांचा विकास करणे.

  • परिचय :-

 

ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामपंचायत विभाग कार्यरत आहे. जिल्ह्यातील गावे स्वयंपुर्ण व्हावीत, तिथे सर्व मुलभुत सुविधा उपलब्ध असाव्यात व तेथील जनतेला सर्व सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात या हेतुने स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

या विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी व नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना, उपक्रम राबविण्यात येतात. मजबूत पंचायतराज प्रणाली मार्फत रचनात्मक, सर्वसमावेशक व स्थायी ग्रामीणविकास साधणे हे या विभागाचे ध्येय आहे.

 

  • उदृष्टी आणि ध्येय :-        

 

  1. ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांना पारदर्शक, लोकाभिमुख, गतिमान व प्रतिसादशिल प्रशासनाद्वारे ग्रामपंचायतींचा सर्वांगिण विकास करणे

  2. स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.

  3. प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे.

 

  • उद्दिष्टे आणि कार्ये:-

 

उद्दिष्टे– ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांना पारदर्शक, लोकाभिमुख, गतिमान व प्रतिसादशिल प्रशासनाद्वारे ग्रामपंचायतींचा सर्वांगिण विकास करणे, ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दीष्ट आहे

कार्ये:-

  1. शाश्वत ग्रामीण विकास.

  2. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.

  3. ग्रामपंचायतींच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.

  4. वेळोवेळी निश्चित गेलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या प्रमुख (फ्लॅगशिप) कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.

 

  • प्रशासकिय रचना :-       

1
bottom of page